मुख्य सामग्रीवर वगळा

लाखो शेतकऱ्यांची मिटणार चिंता

शेती खरेदी-विक्रीस आता ५ गुंठ्याची मर्यादा!


बागायती व जिरायती जमिनीच्या खरेदी आणि विक्रीवरील क्षेत्राचे निर्बंध आता उठणार आहेत. तुकडेबंदी- तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा- १९४७ मध्ये बदल करत जिरायती जमीन खरेदी- विक्रीसाठी किमान २० गुंठे आणि बागायतीसाठी पाच गुंठ्याची मर्यादा असणार आहे. तसा प्रस्ताव महसूल विभागाने सरकारला सादर केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जमीन खरेदी- विक्रीवेळी तंटे किंवा वादविवाद होऊ नयेत यासाठी जिरायत व बागायत जमिनीसाठी राज्य सरकारने नवे नियम हे लागू केले. जिरायत जमीन दोन एकरापेक्षा( ८० गुंठे) कमी असल्यास खरेदी- विक्रीआधीच जिल्हाधिकारी किंवा प्रातांधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक करण्यात आलेली आहे. एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असल्यास त्याची मर्यादा २० गुंठे करून दोन एकराच्या गटातील पाच- सहा गुंठे जमीन खरेदी- विक्री करताच येणार नाही, असाही नियम बनवण्यात आला. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची पंचाईत झाली म्हणून विहीर किंवा रस्त्यांसाठी शेजारील शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीच्या तुकड्यांचे व्यवहार जागेवरच थांबले.

दरम्यान, जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर तेवढ्या क्षेत्राची खरेदी- विक्री होते, पण परवानगीशिवाय का होऊ नये, असा प्रश्न शेतकऱ्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला विचारला. आंदोलने झाली, अनेकांनी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदने दिल्या नंतर महाविकास आघाडी सरकारने कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि लोकांकडून सूचना, हरकती मागविल्या. जवळपास एक हजारांहून अधिक जणांनी हरकती, सूचना महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या. त्या सर्वांचा सारासार विचार करून शेतकऱ्यांच्या अडचणी सुटतील, असा सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तो प्रस्ताव आता महसूल विभागाने शिंदे- फडणवीस सरकारला दिला असून ऑक्टोबर महिन्यांत अंतिम निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी सुरु होईल, असे महसूल विभागातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून शासनाचा महसूलदेखील वाढणार nullअसल्याचे कळते. 

काही दिवसांत अंतिम निर्णयबागायती व जिरायती शेतीच्या खरेदीची मर्यादा किती असावी, यासंदर्भात नागरिकांकडून हरकती, सूचना मागविल्या आल्या होत्या आणि त्यात बरेचसे मतप्रवाह होते. त्यासंदर्भात सखोल अभ्यास करून शासनाला प्रस्ताव सादर केला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. - असे अव्वर मुख्य सचिव,नितीन कर्री यांच्या कडून सांगण्यात आले.

कृषी क्षेत्राची सर्व माहिती https://www.krishigrnews या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

या महिलांना मिळणार 6000 रुपये तारीख ठरली सरकारची मोठी घोषणा Aditi tatkare ladki bahin

Aditi tatkare ladki bahin महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकर व विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. Ladki bahin yojana योजनेचा उद्देश हा राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना स्वावलंबी करणे हाच आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ladki bahin yojana बद्दल नुकतीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा आणि आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने आतापर्यंत अविश्वसनीय प्रगती केली आहे. अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून काही अर्ज अजून येणे बाकी आहे, ही संख्या योजनेच्या लोकप्रियतेचे आणि महिलांमधील जागरूकतेचे द्योतक आहे. सरकारचे लक्ष्य अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे असून, त्यादिशेने वाटचाल सुरू आहे आणि लवकर ते पूर्ण होईल.  लाभार्थींची संख्या वाढत आहे Ladki bahin yojana च्या अंमलबजावणीची गती पाहता, लाभार्थींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जुलै मह

लाडकी बहिन योजना: नोंदणीची तारीख वाढली

लाडकी बहिन योजनेसाठी नोंदणीची तारीख ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.  सुरुवातीला, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 होती, परंतु पात्र महिलांना योजनेचा लाभ घेण्याची आणखी एक संधी देण्यासाठी ती वाढवण्यात आली आहे. ज्या महिला मूळ मुदतीपर्यंत अर्ज करू शकल्या नाहीत किंवा चुका किंवा माहिती गहाळ झाल्यामुळे त्यांचे अर्ज नाकारले गेले आहेत अशा महिलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  Ladki Bahin Yojana  योजनेचे तपशील येथे आहेत: लाडकी बहिन योजना महाराष्ट्र 2024 - योजनेचे नाव: माझी लाडकी बहिन योजना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ - लॉन्चची तारीख: 28 जून 2024 - अर्ज सुरू होण्याची तारीख: जुलै 1, 2024 - प्रारंभिक अर्जाची अंतिम मुदत: ऑगस्ट 31, 2024 - विस्तारित मुदत: सप्टेंबर 30, 2024 - मासिक आर्थिक सहाय्य: रु. 1500 - पहिल्या हप्त्याची तारीख: 14 ऑगस्ट 2024 - दुसरा हप्ता तारीख: 29 ऑगस्ट 2024 - एकूण लाभार्थी: पहिल्या टप्प्यात 1.4 कोटी महिला, दुसऱ्या टप्प्यात 50 लाख  Ladki Bahin Yojana  माझी लाडकी बहिन योजना साठी पात्र होण्यासाठी, अर्जदारांनी खाल

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू।

 Saur krushi pump yojana: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू, हे शेतकरी होणार पात्र नवीन GR आला - कृषी न्यूज Saur krushi pump yojana Saur krushi pump yojana Saur krushi pump yojana: नमस्कार शेतकरी बंधुंनो, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही नव्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून 9/1/2023 रोजी नवीन जीआर आलेला आहे. या नवीन जीआर मध्ये नेमके काय काय आहे? या योजनेचा अर्ज कोठे आणि कसा भरायचा? संपूर्ण माहिती ही खालील दिलेली आहे. solar pump  मित्रांनो, फक्त कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गतच सरकार 2 लाख शेतकऱ्यांना Solar pump देणार आहेत. परंतु सध्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू झाल्यामुळे कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत मात्र 1 शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत देखील एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येणार आहेत. म्हणजे या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना (1+1=2 ) 2 लाख शेतकऱ्यांना सौर पंप हे दिले जाणार आहेत. यासंदर्भात सरकारने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलेला आहे.