राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह या 21 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा तसेच हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज आणि इशारा
KRISHI-E Havaman Andaj : राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह या 21 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
👇🏻हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज आणि इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे तर काही धरणे ओव्हर फ्लो आहेत. मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अजूनही नवरात्रीच्या दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई हवामान केंद्राने गुरुवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला असून यासंदर्भात अलर्टही जारी करण्यात आला आहे. मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जोर हा कमी होण्याचा अंदाज आहे.
गुरुवारी पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. याबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट ही जारी केला आहे.
दुसरीकडे, मुंबई, रत्नागिरी, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवला असून या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय शुक्रवारी पालघर आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, सातारा या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये सध्या चांगल्या ते समाधानकारक श्रेणीत नोंदवला जात आहे.
हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज आणि मार्गदर्शन :
25 सप्टेंबर पासून राज्यातील पावसाचा जोर ओसरेल!
राज्यात भाग बदलत 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर भाग बदलत मुसळधार पावसाचा अंदाज आहेच पण सर्वदुर नाही!
👇
राज्यात दि.21 ,22,23,24 सप्टेबंर राज्यात पूर्वविदर्भ, प- विदर्भ, मराठवाडा , व उत्तर महाराष्टात पाउस पडणार आहे च शेतकर्यानी पिकांची काळजी घ्यावी .
(आनंदाची बातमी )
पंजाब डख यांच्या माहीतीस्तव 👇
🔴 द्राक्ष व सोयाबिन शेतक- ऱ्यासाठी
राज्यातील पाउस 24 सप्टेबर पर्यंत आहे 25 तारखे पासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून ज्यांची सोयाबिन काढणीस आली आहे. त्यानी काढूण घ्यावी व झाकुण ठेवावी .
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.15/ 09 /2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा