पीक विमा 2024 ; राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आता बाधित शेतकऱ्यांना २५% पीक विम्याचे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे.
पीक विमा 2024 ; 25% विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
राज्यातील बीड, जालना, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, आणि परभणी जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांमध्ये बाधित शेतकऱ्यांचे दावे (क्लेम/claim) करण्यात आले आहेत आणि, त्यानुसारच जिल्हास्तरीय समित्यांनी अधिसूचना जारी करण्यास सुरुवात ही केली आहे.
पीक विमा 2024 ; कधी मिळेल ?
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसून या पार्श्वभूमीवर, नुकसानीचे प्रमाण जाणून घेतल्यानंतर पीक विमा कंपन्यांसोबत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विम्याचे (पीक विमा 2024) वाटप करण्याचे निर्देश दिले जातील असे कळते.
जिल्हास्तरीय पीक विमा समित्यांनी जारी केलेल्या अधिसूचनांनुसार, महसूल मंडळातील नुकसानीचे प्रमान पीकविमा कंपन्यांकडे पाठवले जातात त्यानंतर 25% पीक विमा शेतकऱ्यांना वितरित केला जाईल अशी माहिती मिळाली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा